मराठवाडा

हिंगोली : भेंडेगाव येथे १०० हेक्टरवर उभारणार लॉजिस्टिक पार्क; जिल्हाधिकारी यांना जमीन खरेदीची परवानगी

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : भेंडेगाव (ता.वसमत) येथे ड्रायपोर्ट आणि मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी चोंडी (सेंदुरसेना) येथील ८९.६० हे. आर खासगी आणि १०.४० हे. आर शासकीय अशी एकूण १००.०० हे. आर जमीन खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्चस्तरीय कमिटीने जिल्हाधिकारी यांना जमीन खरेदीची परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लवकरच जागा खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

खासदार हेमंत पाटील यांनी ड्रायपोर्ट उभारण्यासाठी आणि नवी मुंबईजवळ निर्यात सुविधा केंद्र उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात १० ऑक्टोबर २०२२ रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर उद्योग विभागाद्वारे जमिनीची पाहणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मौ.चोंडी येथील ८९.६० हे.आर खाजगी व १०.४० हे.आर सरकारी अशा एकूण १००.०० हे. आर क्षेत्र जमिनीची निवड समितीमार्फत १० मार्च २०२३ रोजी करण्यात आली होती.

या प्रकल्पाचा उद्योग, व्यवसायाशी निगडीत घटकांना मोठा फायदा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहुन नेण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. यातुन शेतकऱ्यांना कमी खर्च आणि जास्तीचा लाभ होईल. परिसरातील उच्चशिक्षित आणि अर्धकुशल कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यांना नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरात जाण्याची गरज राहणार नसल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT