मराठवाडा

हिंगोली : प्लॉटच्‍या परस्पर विक्रीप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाचे बेमुदत उपोषण

backup backup

वसमत; पुढारी वृत्तसेवा : जवळाबाजार ग्रामपंचायतीने प्लॉटच्‍या परस्पर विक्री केली आहे. या प्रकरणाची सखाेल चाैकशी करावी, या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक रामप्रसाद बाहेती (वय ७३) यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे .

 बाहेती हे मोंढ्यातील व्यापारी आहेत. जवळाबाजार येथे त्‍यांच्‍या मालकी जागेत १९९५ मध्ये १११ प्लॉटचा त्‍यांनी एन ए नकाशा काढला हाेता.  त्यापैकी १०१ प्लॉट विक्री केली. तर १० प्लॉट स्वतः साठी ठेवले होते. जवळाबाजार येथील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे १० प्लॉट परस्पर लोकांना विक्री केला असल्याचा आरोप बाहेती यांनी केला आहे.

 याप्रकरणी त्‍यांनी औंढा नागनाथ तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले हाेते. त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्‍याचा आराेप करत रामप्रसाद बाहेती १६ सप्टेंबर २०२२ पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT