मराठवाडा

नांदेड : घराची भिंत कोसळून पाच जण जखमी

निलेश पोतदार

हाणेगाव; पुढारी वृत्तसेवा तुंबरपल्ली गावात काल (गुरुवार) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घराची दुमजली भिंत कोसळली. या घटनेत पाच जण जखमी झाले. जखमींवर उदगीर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तुंबरपळी येथे पंडीत मारोती दिंडे यांचे मालकीचे जुने दगडा मातीचे बांधकाम असलेले दुमजली घर आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे घराची भिंत कोसळली. या दुर्घटणेत पाच जण जखमी झाले. या जखमींमध्ये पंडित मारुती दिंडे (वय ५५), कमलाबाई पंडित दिंडे (वय ४५), माधव मारोती दिंडे (वय ५०), सविता महादेव दिंडे (वय ३०), अंजली पंडित दिंडे (वय१४), श्रीनिवास महादेव दिंडे हा सहा वर्षांचा मुलगा आहे.

घराची भिंत कोसळल्‍यावर झालेल्‍या मोठ्या आवाजाने शेजारील लोकांनी धाव घेतली. यावेळी गावकऱ्यांनी दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्‍या पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यातील पंडीत दिंडे यांच्या कुटुंबातील जखमींना तात्काळ उदगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT