

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयने (BCCI) ACC इमर्जिंग महिला आशिया चषक 2023 साठी भारत 'अ' (Emerging) संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 12 जूनपासून हाँगकाँगमध्ये सुरू होणार आहे. 21 जूनरोजी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहेत.
'अ' गटात भारत, हाँगकाँग, थायलंड आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. तर 'ब' गटात बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती या संघाचा समावेश (BCCI) आहे.
भारत 'अ' संघाची 13 जूनरोजी टिन क्वॉंग रोड रिक्रिएशनच्या मैदानावर हाँगकाँगविरुद्ध पहिली लढत होईल. भारत 'अ' संघ साखळी सामन्यात 3 सामने खेळणार आहे. पहिला सामना १३ जून रोजी हाँगकाँग, १५ जून रोजी थायलंड 'अ' आणि १७ जून रोजी पाकिस्तान 'अ' विरुद्ध खेळेल.
बीसीसीआयने श्वेता सेहरावतला संघाची कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तर सौम्या तिवारीला उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. सेहरावत महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सकडून खेळली होती. या संघात श्रेयंका पाटील, कनिका आहुजा आणि इतर काही खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नूशीन अल खादीर काम पाहतील.
भारत 'अ' (उदयोन्मुख) संघ : श्वेता सेहरावत (कर्णधार), सौम्या तिवारी (उपकर्णधार), त्रिशा गोंगडी, मुस्कान मलिक, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, उमा चेत्री (यष्टीरक्षक), ममथा माडीवाला (यष्टीरक्षक), तीतस साधू, यशश्री एस, काशवी गौतम, पार्शवी चोप्रा, मन्नत कश्यप, बी अनुषा.
हेही वाचा