मराठवाडा

नांदेड: श्रीक्षेत्र माहूर येथे गावठी बॉम्ब सदृश्य वस्तूच्या स्फोटात वृद्ध जखमी

अविनाश सुतार

श्रीक्षेत्र माहूर; पुढारी वृत्तसेवा: श्रीक्षेत्र माहूर येथील श्री दत्तशिखर मंदिराच्या दक्षिणेकडील अनुसया माता मंदिराच्या पायरीवर गावठी बॉम्ब सदृश्य वस्तू आदळल्याने एक जण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. नामदेव उमाजी वानोळे (वय 78, रा. सावरगाव, ता. हदगाव, जिल्हा नांदेड) असे जखमीचे नाव आहे. माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनुसया माता मंदिराच्या पायरीवर नामदेव वानोळे यांनी गावठी बॉम्ब सदृश्य वस्तू उचलून पायरीवर आदळला. त्यानंतर त्या वस्तूचा स्फोट होऊन त्यांच्या तळहाताला जखम झाली. तसेच एक बोट तुटून पायरीवर पडले.
मी घटनास्थळाची पाहणी केली. तिथे बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आलेली नाही. कदाचित शिकारीसाठी वापरात येणारी ही वस्तू असू शकते, असे उपविभागीय पोलीस अधिकारी शिनगारे यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT