मराठवाडा

शेतीच्या वादातून नराधम दिराने केला सख्ख्या भावजईचा विनयभंग

backup backup

बीड; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यात दोन सख्ख्या भावांतील जमिनीच्या वादातून नराधम दिराने आपल्या ३५ वर्षीय भावजईचा विनयभंग केला. पीडितेने स्वतःची अब्रू वाचविण्यासाठी दाताने त्या नराधम दिराच्या पाठीचा लचका तोडला.

केज तालुक्यातील दोन सख्ख्या भावा भावात केज न्यायालयात जमिनीचा वाद सुरू आहे. त्यातील एक भाऊ हा अंबाजोगाई सरकारी नोकरी करीत आहे. तर दुसरा शेतमजुरी करीत आहे. दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी पीडितेचा नवरा शेत मजुरीसाठी घरा बाहेर गेला असताना तिचा दीर घरी आला आणि तिच्या नवऱ्याने शेतीचा दावा का दिला? असा सवाल करित विनयभंग केला.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात नराधम दिराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT