Tuljapur News : तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आ.पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळेल : बावनकुळे File Photo
धाराशिव

Tuljapur News : तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आ.पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळेल : बावनकुळे

तुळजापुरात राणाजगजितसिंह पाटील यांचा जंगी सत्कार

पुढारी वृत्तसेवा

With the blessings of Tulja Bhavani, mla Patil will get a chance to become a minister: Bawankule

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : राण-जगजितसिंह पाटील हे तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्राचे आमदार होणे भाग्याचे आहे. भवानीमातेच्या आशीर्वादाने त्यांना राज्याचे मंत्रिपद नक्की मिळेल, असे सांगत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी आ. पाटील यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

आ. राज्य समस्त तुळजापूरकरांच्या वतीने पाटील यांना शासनाच्याकडून १८६५ कोटी रुपये निधी मिळवण्यात योगदान दिल्याबद्दल महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील, माजी आ. सुजितसिंह ठाकूर, तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष अनिल काळे, महंत तुकोजी महाराज, महंत चिलोजी महाराज, आयोजक विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष अर्चना गंगणे, सचिन रोचकरी, नारायण नन्नवरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धूरगुडे, अनिल काळे, सज्जन साळ-खे, अनंत कोंडो, विजय गंगणे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब शामराज, संतोष बोबडे, नरेश अमृतराव, सचिन पाटील, गुलचंद व्यवहारे, अविनाश गंगणे, शिवाजी बोधले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

ना. बावनकुळे म्हणाले, की तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. पाटील यांनी पाठपुरावा केला. राज्य शासनाने १८६५ कोटी रुपये निधी मंजूर केला. प्रदीर्घकाळ आमदार म्हणून काम केलेले राणा दादा यांचा सत्कार माझ्या हस्ते होत आहे याचा मलाही आनंद आहे. आगामी काळात त्यांना राज्य मंत्रिमंडळात तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने संधी मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

आ. पाटील यांनी सांगितले, की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारने तुळजापूर तीर्थक्षेत्र आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला निधी दिला आहे. निश्चितपणे भाविक भक्तांच्या सुविधेसाठी तुळजापूर तीर्थक्षेत्राचा चांगला विकास होईल. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहील. याप्रसंगी प्रास्ताविक आनंद कंदले यांनी केले.

मानपत्राचे वाचन खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शिवाजी बोधले यांनी केले. स्वागताध्यक्ष बाळासाहेब शिंदे व बाळासाहेब शामराज, आयोजक विनोद गंगणे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत झाले. या कार्यक्रमासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भवानी कुंड कल्लोळतीर्थ या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन मंगलमय वातावरणात केले गेले. सत्कार सो-हळा यशस्वी करण्यासाठी विशाल छत्रे, अमर हंगरगेकर, धैर्यशील दरेकर, राम चोपदार, संदीप गंगणे, पंडित जगदाळे, दिनेश बागल, राजेश्वर कदम, किशोर गंगणे, सुहास गायकवाड, नितीन रोचकरी, उमेश गवते, शांताराम पेंदे, यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT