Unseasonal rain : अवकाळी पावसाने पपई बागेचे नुकसान; तहसीलदारांकडून पाहणी file photo
धाराशिव

Unseasonal rain : अवकाळी पावसाने पपई बागेचे नुकसान; तहसीलदारांकडून पाहणी

तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसह शासकीय व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

पुढारी वृत्तसेवा

Unseasonal rain damages papaya orchard; Tehsildar inspects the site

वाशी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसह शासकीय व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. दसमेगाव येथील शाळेचेही नुकसान झाल्याने प्रशासनाने घटनास्थळी भेट देत नुकसानीचा आढावा घेतला.

सोमवारी वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी दसमेगाव येथील शाळेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वाशी शिवारातील शेतांमध्ये जाऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी त्यांनी शेतकरी बालाजी गौतम कवडे यांच्या पपई बागेची पाहणी केली. कवडे यांनी तीन महिन्यांपूर्वी तीन एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती. सध्या कळी धारणेच्या अवस्थेत असलेल्या या बागेला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून हजारो पपईची झाडे तुटून पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाहणीदरम्यान वाशी सज्जाचे तलाठी आशोक राठोड उपस्थित होते.

तहसीलदार म्हेत्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT