वाशी : लॉजवर वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देणाऱ्यांना तसेच ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  pudhari photo
धाराशिव

Sex Trafficking Case : देहविक्री करणाऱ्या दोन पीडितांची सुटका

हॉटेल मालकासह कामगार व चार ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

पुढारी वृत्तसेवा

वाशी : तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉजमध्ये सुरू असलेल्या अवैध देहविक्री व्यवसायाचा वाशी पोलिसांनी धडक कारवाईत पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली असून हॉटेल मालकासह कामगार व चार ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव येथील पृथ्वीराज बियर बारच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लॉजमध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने दि. 19 जानेवारी रोजी रात्री छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली.

या कारवाईत हॉटेल मालक श्रीपती उत्तमराव घुले, कामगार महादेव विष्णू काळे तसेच चार संबंधित ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांचे समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वाशी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT