Two hectares of sugarcane were burnt due to the electricitywire broke
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव तालुक्यातील काकासपूर येथील गोरोबा विठ्ठलराव पाटील यांच्या शेतावरून जाणाऱ्या ३३ केव्ही उच्च दाबाने चालणाऱ्या प्रवाहाची तार तुटल्यामुळे उभ्या असणाऱ्या दोन हेक्टर उसाला मोठी आग लागली आणि यामध्ये १३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दोन हेक्टर ऊस, एक लिंबाचे झाड, सात आंब्याची झाडे, १७ पाईप नग, ठिबक सिंचन संच, असे शेतीचे पीक आणि साहित्य या आगीमध्ये जळून खाक झाले. ते ३० किमी उच्च दाबाची तार तुटल्यामुळे ही तार उसामध्ये पडली आणि उसाने पेठ घेतला ही बाब महावितरण कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लोहारा आणि तुळजापूर येथील अग्निशामकच्या गाड्या बोलावून ही आग आटोक्यात आणली आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील याची झळ पोचली आहे.
याप्रकरणी महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. शेतकरी गोरोबा विठ्ठलराव पाटील यांनाही आग लागल्याची बातमी शेजारच्या शेतकऱ्यांनी सांगितले तत्पूर्वी महावितरण कंपनीने हे बाब लक्षात घेऊन प्रशासन आणि अग्निशामक दलाला संपर्क केला असल्यामुळे या शेतकऱ्याचे सात एकर उसाचे क्षेत्र आगीपासून वाचले आहे.