तुळजाभवानी मंदिरात धार्मिक विधी उत्साहात पार पडले 
धाराशिव

Tuljapur Temple|अन्नदान महाप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता, तुळजाभवानी मंदिरात धार्मिक विधी उत्साहात

Tuljapur Temple |अन्नदान महाप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता, तुळजाभवानी मंदिरात धार्मिक विधी उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची मंगळवारी (दि. २७) अन्नदान महाप्रसादाने सांगता झाली. उत्सवाच्या प्रारंभापासून मंदिरात विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रम उत्साहात पार पडले. ३ ऑक्टोबर रोजी देवीच्या मंचकी निद्रेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर ११ ऑक्टोबरला घटस्थापना, २० ऑक्टोबरला दसरा आणि २१ ऑक्टोबरला पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा पार पडला.

सोमवारी (दि. २६) रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. तसेच महंत वाकोजीबुवा यांच्याकडून प्रथा-परंपरेनुसार जोगवा मागण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, पोलीस निरीक्षक बालाजी येवते, लेखाधिकारी संतोष भेंकी, महंत वाकोजीबुवा यांच्यासह पुजारी, सेवेकरी, मानकरी आणि भाविक उपस्थित होते.

दरम्यान, मंगळवारी रात्रीही सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह देवीची छबिना मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या माध्यम कक्षाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT