Tuljapur temple : तुळजापूर मंदिर परिसर फेरीवाल्यांपासून मुक्त File Photo
धाराशिव

Tuljapur temple : तुळजापूर मंदिर परिसर फेरीवाल्यांपासून मुक्त

भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

Tuljapur temple area free from hawkers

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षापासून तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या सभोवताली असणारा फेरीवाल्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, यामुळे भाविकांना होणारा त्रास कमी झाल्याचे दिसून आले.

तुळजापूर येथे खूप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या असते, दरम्यान तुळजापूर देवीच्या मंदिरासमोर महाद्वार परिसर मेन रोड आणि भवानी रोड येथे खूप मोठ्या संख्येने रस्त्यावर लहान मोठा व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि हातात वस्तू घेऊन विकणारे वस्तू विक्रेते याशिवाय भिकारी आणि रस्त्यावर परडी घेऊन बसणारे परडी वाले यांच्यामुळे हा परिसर अत्यंत गर्दीचा झालेला असतो. परिणामी येथे येणाऱ्या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतो.

अनेक प्रसंगांमध्ये या भाविकांना हाताला पकडणे किंवा कपडे ओढणे असे देखील प्रकार होतात. या परिसरामध्ये खूप मोठी गर्दी झाल्यामुळे होणारा त्रास यामुळे तुळजापूरची सातत्याने बदनामी होत राहिली. काठीवाले आणि रस्त्यावर व्यवसाय करणारे व्यावसायिक यांचे प्रमाण एवढे वाढले की त्याचा त्रास शेजारी असणाऱ्या संपूर्ण बाजारपेठेला होत आहे. यामुळे तुळजापुरची यात्रा देखील बदनाम झालेली आहे.

या प्रकारामुळे लहान मोठे वाद विवाद भांडे आणि मारामारी देखील झालेले आहेत. येथील तक्रारी पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन गुन्हे नोंद देखील करण्यात आले. आणि पातळीवर असलेले लागे संबंध आणि आर्थिक संबंध याच्यामुळे हा प्रकार होतो आहे अशी शहरवासी यामध्ये सातत्याने चर्चा आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळे ही मंडळी तुळजाभवानी मंदिर महाद्वार परिसरामध्ये कायद्याची भीती न ठेवता मनमानी आणि भाविकांना त्रास होईल अशा प्रकारचा व्यवहार करतात अशी लोक भावना झालेली असताना नव्याने निवडून आलेले लोकनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, गटनेते औदुंबर कदम, भाजप नेते विशाल रोचकरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, स्वच्छता विभागाचे प्रमुख दत्तात्रय साळुंखे तसेच पोलीस विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्या खंबीर कामगिरीमुळे या भागात भाविकांना त्रास देणाऱ्या घटकांना दूर करण्या साठी मागील आठ दिवसापासून मोजून चालवली परिणामी या मंदिर परिसरामध्ये सुसह्य आणि चांगले वातावरण निर्माण झाले आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील या प्रकाराने समाधान व्यक्त करून नगराध्यक्ष विरोध गंगणे यांचे विशेष कौतुक केले.

लोकांना जे पाहिजे ते देण्यासाठीच आपण आगामी काळामध्ये आपल्या सत्तेचा उपयोग करूयात असा चांगला संदेश देखील या निमित्ताने आमदार पाटील यांनी उपस्थित नगरपालिका पदाधिकारी यांना दिला.

तुळजाभवानी मंदिर महाद्वार आणि परिसरातील स्वच्छता आणि भाविकांना त्रास होणार नाही असे चांगले वातावरण निर्माण करून तुळजापूर तीर्थक्षेत्राची होणारी बदनामी थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत, यामध्ये बऱ्याच सुधारणा करून हेच वातावरण कायम राहण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील असे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT