Tuljapur News : Governor Verma visited Tuljabhavani
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुरुवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. शासकीय विश्रामगृहात आगमन झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी प्रशासनाच्या तिन्ही वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याचा आढावाही घेतला.
शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पोलिस दलाच्या वतीने राज्यपालांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनीही राज्यपालांचे स्वागत केले. यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा शाल, श्रीफळ, कवड्याची माळ, पुस्तक तसेच श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा देऊन सन्मान केला.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. पांडकर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय आडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. भंडे, तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक माया माने यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.