Crime News  pudhari
धाराशिव

Dharashiv crime : तुळजापूर तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून

कारण अस्पष्ट, डोक्याच्या मागे वार करून संपविले

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ शिवारात एका 36 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णात आनंद साठे (वय 36 वर्षे, रा. सरडेवाडी रोड, मंगरुळ, ता. तुळजापूर) यांचा मृतदेह तुळजापूर-अक्कलकोट रोडलगत नटखळ ओढ्याच्या कडेला दि. 15 एप्रिल रोजी सकाळी आढळून आला. त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस हत्याराने मारहाण करून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी शाम कमलाकर साठे (वय 48 वर्षे, रा. मधला मारुती मंदिराजवळ, मंगरुळ, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या घटनेमुळे मंगरुळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT