Tulja Bhavani Devi : तुळजाभवानी देवीची पौर्णिमा २६ ऑक्टोबरला file photo
धाराशिव

Tulja Bhavani Devi : तुळजाभवानी देवीची पौर्णिमा २६ ऑक्टोबरला

सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या काठ्यांना विशेष मान; छबिन्यात सहभागी होणार

पुढारी वृत्तसेवा

Tulja Bhavani Devi's Purnima is on October 26th

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भरणारी यात्रा २५ ऑक्टोबर रोजी, तर मंदिरातील पौर्णिमा २६ ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. मंदिराच्या कार्यक्रम पत्रिकेत याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यात्रेत सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या काठ्यांना विशेष मान असून, देवीच्या छबिन्यात या काठ्यांचा सहभाग हे यात्रेचे प्रमुख आकर्षण असते.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांतून हजारो भाविक पायी चालत तुळजापुरात दाखल होतात. तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे १० लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात, असा अंदाज आहे. सोलापूर ते तुळजापूर असा पायी प्रवास करून येणाऱ्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्या तुळजाभवानी देवीचे पुजारी सचिन प्रकाशराव पाटील यांच्या निवासस्थानी मुक्कामाला येतात.

पौर्णिमेच्या रात्री दहा वाजता निघणाऱ्या छबिन्यावेळी या काठ्यांना विशेष महत्त्व असते. पाटील यांच्या वाड्यावरून सोलापूरच्या मानकऱ्यांसमवेत पालखी आणि काठ्या वाजतगाजत मिरवणुकीने छबिन्यात सहभागी होतात. नवरात्र महोत्सवानंतर भाविकांची गर्दी, सुविधा आणि सुरक्षिततेच्या नियोजनासाठी पाच दिवसांचा विश्रांती काळ ठेवण्यात आला आहे.

सध्या शिलंगण कार्यक्रमानंतर तुळजाभवानी देवीची श्रमनिद्रा सुरू असून, पौर्णिमेच्या मध्यरात्री ती पूर्ण झाल्यानंतर देवीची मूर्ती मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित केली जाणार आहे. पौर्णिमा यात्रेसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन आणि सुरक्षिततेच्या व्यवस्थेवर भर देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT