तुळजाभवानी देवीचा नवरात्र महोत्सव  
धाराशिव

तुळजापुरात देवीच्या धार्मिक विधीला हजारो भाविकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : आई राजा उदो उदो, जय घोषामध्ये तुळजाभवानी देवीचे शारदीय नवरात्र महोत्सव पार पडले. आज (दि.१२) दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारा होमकुंडावर झालेल्या धार्मिक विधीमध्ये हजारो भाविकांची उपस्थिती होती. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या होमावरील धार्मिक विधीला जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबासे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि देवीचे पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंदफळ येथील मानाचे बोकड वाजत गाजत तुळजापुरात आल्यानंतर भाविक भक्तांनी त्याचे मनोभावे दर्शन घेतले.

त्यानंतर तुळजाभवानी मंदिर परिसर येथे जमलेल्या हजारो भाविकांनी 'आई राजा उदो उदो'चा जयघोष करत होम कुंडावर संपन्न झालेल्या धार्मिक विधीसाठी तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, सचिन परमेश्वर शशिकांत पाटील, सचिन पाटील, अतुल मलबा यांच्यासह इतर पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी बारा वाजता तहसीलचे प्रतिनिधी यांच्याकडून धार्मिक विधी करण्यात आला . त्यानंतर घट उठवण्यात आले.

होमकडावरील धार्मिक विधी अत्यंत शांततेत झाला. कोणताही अनुचित प्रकार या काळात घडला नाही. जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. याशिवाय पोलिस यंत्रणेकडून शांतता राखण्याच्या उद्देशाने महत्त्वाच्या सूचना दोन्ही क्षेपणावरून देण्यात येत होत्या. सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी तैनात होते. दुपारी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.महाद्वारासमोर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT