Sharadiya Navratri festival begins with Ghatsthapana on September 22nd
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या आरती नवरात्र महोत्सवाला २२ सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमाला प्रारंभ होईल. यासंदर्भातील अधिकृत माहिती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाची उद्घोषणा मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे १४ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू होत असून २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल. मध्यरात्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण होणार आहे.
२९ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असतानाची तुळजाभवानी देवी असा देखावा भवानी तलवार महापूजा मांडून केला जाईल. दुर्गाष्टमी ३० सप्टेंबर रोजी आहे या दिवशी भवानी मातेसमोर महिषासुर मर्दिनी अशी आरास केली जाईल याच दिवशी होमकुंड प्रज्वलित होऊन स्थानिक ब्रह्म वृंदांच्या उपस्थितीत येथील कार्यक्रम पार पडतील. सहा वाजून दहा मिनिटांनी पूर्णवती दिली जाईल आणि रात्री दहा वाजता छबिना होईल.
होमावरील धार्मिक विधी दुपारी बारा वाजता महानवमी एक ऑक्टोबर रोजी होणार असून याच दिवशी नगरच्या भिंगारू येथून संत जनकोजी भगत यांची येणारी पालखीची मिरवणूक निघेल. २ ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा होईल या नगरच्या पालखीमध्ये याच दिवशी तुळजाभवानी देवीचे पहाटे साडेचार वाजता सीमोलगन्न संपन्न होईल. हे ऐतिहासिक श्रीलंगण झाल्यानंतर देवी नगरच्या पलंगावर पुढील पाच दिवसांसाठी श्रमनिद्रा करेल. सायंकाळी मंदिर संस्थानच्या वतीने शमी पूजन कार्यक्रम होईल.
वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असण ारी कोजागिरी पौर्णिमा यावर यावर्षी सहा ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी लाखो भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी उपस्थित असतात. ७ ऑक्टोबर रोजी मंदिराची पौर्णिमा आहे पहाटे देवीच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना मुख्य सिंहासनावर होईल.
या दिवशी सोलापूर येथून येणाऱ्या शिवलाल तेली समाजाच्या काठ्या येथील देवीचे पुजारी सचिन पाटील यांच्या निवासस्थानी येणार आहेत. या काठ्यासह देवीचा छबिना निघणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी अन्नदान कार्यक्रमातून रात्री दहा वाजता सोलापूरच्या काठ्यासह छबिना मिरवणूक निघणार आहे.
२३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या काळात नवरात्राचा धार्मिक कार्यक्रम होईल या काळात देवीची नित्य उपचार पूजा आणि छबीना मिरवणूक निघणार आहे. नवरात्रीचे आकर्षण असणाऱ्या देवीच्या पाच महापूजा २६ सप्टेंबरपासून सुरू होतील ललिता पंचमी २६ रोजी असून या दिवशी रथ अलंकार महापूजा होईल रात्री छबिना निघेल दिवसभर दर्शन भाविकांना खुले राहील.
२७ सप्टेंबर रोजी षष्ठी असून या दिवशी मुरली अलंकार महापूजा केली जाईल. सकाळी आणि संध्याकाळच्या अभिषेक पूजा झाल्यानंतर पूजा आणि रात्री दहा वाजता छबिना निघेल. २८ सप्टेंबर रोजी सप्तमी असून या दिवशी देवीला विशेष काही अलंकार महापूजा होईल सकाळ सायंकाळ रात्रीचे धार्मिक विधी परंपरागत पद्धतीने होतील.