Dharashiv Crime Pudhari File Photo
धाराशिव

Minor Girl Assault Case : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

Sexual Assault on a Minor Girl

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने जाणाऱ्या तिला तिसगावाकडे रस्त्यालगतच्या पायवाटेने डोंगराजवळ नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दि. ६ मे रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी, फिर्यादीचे नाव गोपनीय ठेवले असून अधिक तपास सुरु केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT