Dharashiv Crime | धाराशिव मध्ये नात्‍याला काळीमा फासणारी घटना: सावत्र आईवर मुलाचा अत्‍याचार!

मारहाण करुन अत्‍याचार केल्याची फिर्याद
Dharashiv Crime
धाराशिव मध्ये नात्‍याला काळीमा फासणारी घटना File Photo
Published on
Updated on

धाराशिव : कळंब तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. २६ वर्षीय विवाहित महिलेवर सावत्र मुलाने लैंगिक अत्याचार व मारहाण केल्याचा गुन्‍हा दाखल झाला आहे. स्‍वत:च्‍या आईला परत आणण्‍यासाठी त्‍याने हे कृत्‍य केल्‍याचे पिडितेने फिर्यादीत म्‍हटले आहे. 

हा प्रकार समोर आल्‍यानंतर तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. या सावत्र मुलाच्‍या मित्रांनीही मारहाण केल्‍याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता पीडिता घरी असताना तिच्या सावत्र मुलाने तिला कायमचे माहेरी पाठविण्याच्या उद्देशाने व स्वतःच्या आईला परत घरी आणण्यासाठी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यावेळी दुसऱ्या एका तरुणाने अत्‍याचारात मदत केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दोघांनीही पीडितेस शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. या  घडल्‍या प्रकाराबाबत पीडितेने दि. २० फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरुन दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीसांनी पुढील तपास सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपी तसेच पीडितेचे नाव व गाव पोलिसांनी गोपनीय ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news