Dharashiv : शिक्षक नसल्याने शाळेला ठोकले कुलूप ! File Photo
धाराशिव

Dharashiv : शिक्षक नसल्याने शाळेला ठोकले कुलूप !

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता ग्रामस्थांचा संताप अनावर; तीव्र आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

school locked due to lack of teachers

परंडा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जवळा (नि.) येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेला झाजी विषयाच्या शिक्षकाची कमतरता जाणवत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (दि. १४ जुलै) शाळेला कुलूप ठोकत आपला रोष व्यक्त केला. शिक्षक मिळवून देण्याच्या मागणीकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आणि टोकाचे पाऊल उचलले. या शाळेत इयत्ता नववी व दहावीत सुमारे १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र इंग्रजी विषयाच्या शिक्षकाच्या जागेवर कार्यरत अस-लेला शिक्षक प्रतिनियुक्तीवर शिक्षण संचलन पुणे येथे पाठवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी कोणताही शिक्षक उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून, ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून शालेय समितीने गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदने देऊन शिक्षक त्वरित उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा शाळा बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने सोमवारी गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकत आंदोलन छेडले.

या आंदोलनात माजी सरपंच नवजीवन चौधरी, शालेय समिती अध्यक्ष बाबासाहेब गवारे, सो. व्हा. चेअरमन सुरेश कातुरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य हनुमंत सांगडे, अरविंद कातुरे, सचिन कारकर, आणि परशुराम खंडे, सुधीर सांगडे, गणेश गवारे, हंबीराव कारकर, धर्मा सांगडे, वसंत चौधरी, विनोद सुतार, लहू रोडे, नारायण राऊत, अरिफ इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, शाळा सुरळीत सुरू असून विद्यार्थ्यांची संख्या देखील समाधानकारक आहे, तरीदेखील शिक्षकांचे पद रिक्त ठेवले जात आहे, हे अत्यंत प्रशासनाचे अपयश आहे. इंग्रजी हा बोर्ड परी-क्षेसाठी महत्त्वाचा विषय असून त्याच्या अभावी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात आहे.

अन्यथा आंदोलन तीव्र

शाळेच्या गुणवत्तेवर गदा येण्याआधी प्रशासनाने तातडीने शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणाकडे शिक्षण विभागाने गांभीर्यान लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अशा संतप्त प्रतिक्रिया तालुक्यात इतर ठिकाणीही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चीन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT