Dharashiv News : १०८ फूट शिल्पासाठी सादर होणार नमुने  File Photo
धाराशिव

Dharashiv News : १०८ फूट शिल्पासाठी सादर होणार नमुने

तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Samples 108-foot sculpture Tulja Bhavani Chhatrapati Shivaji Maharaj MLA Ranajagjitsinh Patil

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे १०८ फूट उंचीचे भव्य शिल्प तुळजापुरात आता लवकरच साकारले जाणार आहे. अष्टभुजा 'शिवभवानी'चा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी विचार त्यानिमित्ताने सर्व भाविकांना अनुभवता येणार आहे. त्यासाठी राज्याच्या कला संचालनालयाकडे देशभरातील शिल्पकारांकडून शिल्प नमुने मागविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

ऑगस्ट अखेरीस अडीच ते तीन फूट आकाराचे फायबरचे शिल्प नमुने कला संचालनालयाकडे प्राप्त होणार आहेत. त्यातून पहिल्या पाच शिल्पांची निवड करून त्या पाच शिल्पापैकी एक शिल्प अंतिम केले जाणार आहे. हे शिल्प शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या प्रेरणेची जाज्वल्य गाथा असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. मुंबईच्या निर्मल भवन येथील मित्र संस्थेच्या कार्यालयामध्ये तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने एक उच्चस् तरीय बैठक झाली होती.

या बैठकीस जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पूजार हे देखील उपस्थित होते. या बैठकीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. १०८ फूट उंच शिल्प उभारण्याच्या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली. सुप्रसिद्ध इतिहासकार आणि शिवव्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी या प्रसंगाचे ऐतिहासिक संदर्भ, शिलालेख, ग्रंथ व लोक परंपरेवर आधारित माहिती सादर केली. राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी तुळजाभवानी देवीच्या मूर्तीचे स्वरूप सादर केले. या नियोजित भव्य शिल्पामुळे भाविकांना केवळ धार्मिक अनुभूतीच नव्हे तर राष्ट्रनिमति छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे प्रेरणास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेत असलेला अद्वितीय आणि अनुपम देखावा अनुभवता येणार आहे.

हे शिल्प श्रद्धा आणि प्रेरणेचे रोमांचक प्रतीक असणार आहे. शिल्पाभोवती आकर्षक परिसर विकास, प्रकाश योजना, संग्रहालय व माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे. या शिल्पासाठी कला संचालनालय आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील नामवंत शिल्पकारांना शिल्पाचे नमुने सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ऑगस्ट अखेरीस अडीच ते तीन फूट आकाराचे फायबरचे शिल्प नमुने सादर करण्यात येणार आहेत. त्यातून उत्कृष्ट पाच शिल्प नमुन्याची निवड होणार आहे. या पाच सर्वोत्तम शिल्पापैकी सर्वोत्कृष्ट शिल्प निवडल्यानंतर प्रत्यक्ष शिल्प उभारणीस प्रारंभ केला जाईल.

शिल्पकारांना मिळणार १७.५ लाख रुपये मानधन

फायबर मॉडेल तयार करण्यासाठी इच्छुक शिल्पकारांकडे शिल्प कलेतील पदवी अथवा पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय किमान १५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणेही अपेक्षित आहे. तयार करण्यात आलेल्या फायबर मॉडल्स मधून एकूण पाच मॉडेल्सची निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक शिल्पकाराला दीड लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच अंतिम निवड झालेल्या सादरकर्त्याला १० लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT