Dharashiv News : अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन file photo
धाराशिव

Dharashiv News : अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

तुळजापूर : कठोर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Protest by employees wearing black armbands for abusing officials

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत मंदिरातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. याप्रकरणी संबंधितांविरोधात योग्य कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या निवेदनानुसार, १८ जुलै रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता एका पुजाऱ्याच्या मोबाईलवरून विजय गंगणे यांनी प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी अर्वाच्य व असंसदीय भाषेत संवाद साधत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असून मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाला निवेदन देऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली.

या निवेदनावर तिरुपती वाघे, जयसिंग पाटील, प्रकाश भोसले, एम. एम. दीक्षित, महेंद्र आदमाने, नितीन भोयर, सुजय मेश्राम, उमाकांत क्षीरसागर, स्वप्निल पवार, अभिजित तेरखेडकर, अर्जुन आमले, आकाश गायकवाड, रवींद्र चोरगे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT