Omraje Nimbalkar pudhari
धाराशिव

Omraje Nimbalkar Decision: कोर्टाचा निकाल येताच 'ऑपरेशन टायगर' फेल? ओमराजे अद्याप शिंदे गटात जाणार नाहीत; निर्णय मतदार संघातच

Anirudha Sankpal

Omraje Nimbalkar Reaction: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज सीबीआय विशेष न्यायालयानं निकालाचं वाचन केलं. यावेळी न्यायालयानं सबळ पुराव्याअभावी सर्व ९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर आता ओमराजे निंबाळकर यांची प्राथमिक प्रतिक्रिया आली आहे.

ओम राजे निंबाळकर यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली असून त्यांनी निकाल दुर्दैवी आहे. उच्च न्ययालयात जाणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपली राजकीय भूमिका देखील बदलत आपण तुर्तास शिंदे गटात जाणार नाही. याचा निर्णय मतदार संघात जाऊनच दोन दिवसात घेण्यात येईल असं सांगितलं.

दरम्यान, ज्यावेळी निकाल जाहीर झाला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात होते. त्याचबरोबर तिथं अमित शहा देखील अंबाबाई मंदिर विकास कामांचे उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमात अमित शहा देखील उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे हे फोनवर बोलत बाहेर पडताना दिसले. पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल आल्यानंतर या तिघांची बैठक झाली त्यात. अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री सीबीआयला या प्रकरणी वरिष्‍ठ न्‍यायालयात दाद मागण्‍यासंदर्भात कार्यवाही करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

राजकीय भूमिकेत बदल; अमित शहांचे सीबीआयला निर्देश

आता या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपली राजकीय भूमिका बदलल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या ओमराजे निंबाळकर हे तुर्तास तरी आपण शिंदे गटात जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. ते याबाबतचा निर्णय मतदार संघात जाऊनच घेणार आहेत. विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील उद्धव ठाकरेंचा फोटो हटवलेला नाही.

शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर हे यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना ९ पैकी ६ खासदार फोडणं गरजेचं आहे. त्यामुळं आता जर ओमराजे निंबाळकर यांनी माघार घेतली तर एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण डाव फसण्याची शक्यता आहे. नुकतेच कोल्हापुरात बोलताना अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंनी संपूर्ण शिवसेनाच हातात घेतल्याचं वक्तव्य केलं होतं.

२० वर्ष आम्‍ही खूप भोगलं : अर्चना पाटील

या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांच्या सून अर्चना पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, आम्ही २० वर्षे खूप भोगलं. कोणीही उठून आरोप केले. आमच्या कुटुंबाला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. दर निवडणुकीत आमच्यावर प्रचंड आरोप झाले. लोकांना माहीत होतं की आम्ही गुन्हा केलेला नाही. लोकांनी आम्हाला आधार दिला. आम्ही कोणतीही चूक केली नव्हती. आमच्‍यावर झालेल्‍या आरोप व पद्मसिंह पाटील यांना झालेल्‍या अटकेनंतर सासूबाई धक्क्याने गेल्या. पद्मसिंह पाटील यांनी विविध मंत्रीपदे भूषविली होती. कोणताही गुन्‍हा केला नसताना त्‍यांना तुरुंगावास भोगावा लागला ते खूपच वेदनादायी होते. गृहराज्यमंत्री असणाऱ्या माणसाला प्रचंड वेदना झाल्या. राणा जगजितसिंह यांना सतत गेली २० वर्षे हा तणाव सहन करावा लागला. माझ्‍या मोठ्या मुलांवरही याचा मानसिक परिणाम झालात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT