उमरगा येथे संतोष देशमुख यांच्या हत्येचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध केला.  Pudhari Photo
धाराशिव

उमरगा येथे संतोष देशमुख यांच्या हत्येचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध

Dharashiv News | शनिवारी उमरगा बंदचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : धाराशिवच्या उमरगा येथे बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा समाज बांधवानी आज (दि. ६) हत्येच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी शनिवारी (दि. ८) उमरगा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मीक कराड, राहूल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत दहन करण्यात आले. यावेळी शांतकुमार मोरे, व्ही. एम. पाटील, शरद पवार, योगेश तपसाळे, डी. के. माने, किशोर माडजे, दत्ता शिंदे, नाना मदनसुरे, सुधाकर पाटील, प्रा. जीवन जाधव, लक्ष्मण शिंदे, माधव पवार, सुमित घोटाळे, राहुल शिंदे, रोहित पवार, शहाजी चालुक्य, वसंत माने, शैलेश वागणे, राहुल शिंदे, विशाल माने, प्रसाद गायकवाड, अनिकेत साठे, अनुप माने, स्वप्निल गुंठे, साहित्य तोरणेकर, सुरज चांदुरे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT