धाराशिव : चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू; चौघांवर गुन्हा

Dharashiv crime : हिंगळजवाडी येथील घटना
Dharashiv crime news
चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगळजवाडी येथे घडली.
Published on
Updated on

तेर : धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला. तानाजी भगवान मुळे (वय ६५) असे या मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.२) मध्यरात्री १२.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ हिंगळजवाडी गावकऱ्यांनी राज्य मार्गावर रास्ता रोको केला. याप्रकरणी संशयित आरोपी संजय राजेंद्र पवार, जितू प्रभू पवार (दोघेही रा. तेर), अमोल ईश्वर काळे, ईश्वर रामा काळे (दोघेही रा.हिंगळजवाडी) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगळजवाडी (ता.धाराशिव) येथील तानाजी मुळे हे रविवारी रात्री गावाजवळ असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास चार चोरटे त्यांच्या शेडमध्ये घुसले. यावेळी ४ शेळ्या चोरून नेत असताना तानाजी मुळे जागे झाले. त्यानंतर त्यांनी चोरट्यांना विरोध केल्याने चोरट्यांनी दगडाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास हजारे, तेर येथील दूरक्षेत्रचे बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी सोमवारी (दि.३) तेर-धाराशिव मार्ग हिंगळजवाडी येथे रास्ता रोको केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news