कळंबमध्‍ये लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त pudhari photo
धाराशिव

Illegal Gutkha Seized : कळंबमध्‍ये लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त

भरवस्तीतच गुटख्याचे गोदाम उघडकीस आल्याने शहरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

कळंब : शहरातील पापडे गल्ली परिसरात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर पोलिसांनी छापा मारुन सुमारे ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भरवस्तीतच गुटख्याचे गोदाम उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी पापडे गल्ली येथील एका गोदामावर पंचांसमक्ष छापा टाकला. तपासणीदरम्यान विविध कंपन्यांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. शहरात गेल्या काही दिवसांपासून गुटख्याची अवैध विक्री वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ५ लाख ६९ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या कारवाईत पोलीस निरीक्षक शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे, पोलीस नाईक भाऊसाहेब पौळ, अजीज शेख, इरफान शेख तसेच पोलीस अंमलदार परमेश्वर कदम, अनिल भोसले, आसाराम खाडे, गोविंद मोटेगावकर आणि महिला पोलीस अंमलदार क्षीरसागर यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अवैध गुटखा विक्री व साठवणुकीविरोधातील कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT