Beed Crime | युसुफवडगाव परिसरात फिल्मी स्टाईल पाठलाग करून ४.२५ लाखांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Kej Yusufwadgaon Police Action
स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांचा गुटखा व वाहन जप्त केले.Pudhari
Published on
Updated on

Kej Yusufwadgaon Police Action

केज : अवैध गुटखा वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांचा गुटखा व वाहन जप्त केले. युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे सहा किलोमीटरपर्यंत पाठलाग करून संशयित वाहन ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेला युसुफवडगाव परिसरात अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस उपनिरीक्षक खटावकर, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.

Kej Yusufwadgaon Police Action
Beed Crime : घरफोडी करणारा चोरटा दोन तासांत मुद्देमालासह जेरबंद

दरम्यान, माळेगावच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्र. एमएच-०१/बीटी-२४४२) संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने न थांबता वाहन साळेगावच्या दिशेने वेगाने पळविले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला.

साळेगाव बसस्थानक परिसरातून लोखंडी वस्तीच्या दिशेने वाहन घेऊन चालकाने पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुमारे सहा किलोमीटरच्या पाठलागानंतर पोलिसांनी वाहन अडवून ताब्यात घेतले.

Kej Yusufwadgaon Police Action
Beed Crime News : पिस्टलने जीवे मारण्याच्या धमकीची तक्रार, धनंजय देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये पोत्यांमध्ये भरलेला राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत २ लाख २१ हजार रुपये असून वाहनासह एकूण ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी पोलीस हवालदार दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून सब्दर सय्यद बुढन आणि राजू मुदसिर सय्यद (दोघे रा. अजिजपुरा, केज) यांच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेंडगे पुढील तपास करीत आहेत.

Kej Yusufwadgaon Police Action
Beed Crime | माजलगावजवळ गोवंशाच्या अवशेषांचा साठा आढळल्याने खळबळ ; चौकशीची मागणी

पाठलागादरम्यान गुटख्याची पोती रस्त्यावर फेकण्याचा प्रयत्न

पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी वाहनातून गुटख्याची पोती रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली. साळेगाव बसस्थानकापासून पुढे जाताना एकामागून एक पोती रस्त्यावर टाकण्यात आली. एवढेच नव्हे तर दोन पोती ऊसाच्या शेतातही फेकण्यात आली. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत रस्त्यावर आणि शेतात फेकलेला सर्व गुटखा जप्त केला. त्यामुळे आरोपींचा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news