बदलत्या प्रचार पद्धतीत सोशल मीडियाचे आकर्षण pudhari photo
धाराशिव

Digital election campaigning : बदलत्या प्रचार पद्धतीत सोशल मीडियाचे आकर्षण

प्रचाराचा फड रंगतोय मोबाईलवर, कार्यकर्तेही जोमात

पुढारी वृत्तसेवा

विकास उबाळे

कसबे तडवळे : सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू होताच गावच्या चौका चौकात राजकीय वातावरण तापू लागले आहे. चौकातील चहाचं हॉटेल ते पान टपरीपासून मोबाइलच्या स्क्रीनपर्यंत निवडणूक चर्चा पोहचू लागली आहे. यावेळच्या निवडणुकीत बदल म्हणजे प्रचारचा मार्ग वेगळा दिसतोय, मागे भिंती रंगवून, प्रचारच्या गाडीवर भोंगे, रस्त्यानी निघालेल्या पदयात्रा व मोठं मोठ्या सभांमधून दिसणारा प्रचार यावेळी थेट सोशल मीडियावरील रील्स, व्हिडिओ आणि पोस्ट्समध्ये दिसून येत आहे

या निडणुकीचा प्रचार याचा केवळ बदल मानसिकतेतील बदलाचेही चित्र आहे मागे निवडणूक लागली उमेदवार जाहीर झाले की प्रचारात गंमजे, झेंडे, फलक, भिंतीवर रंगवलेले निवडणूक चिन्ह व उमेदवार नावे तसेच आणि मोठमोठ्या सभा अशी ओळख होती. उमेदवाराची ताकद त्यांच्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीवर, वाहनांच्या ताफयावर सभेमधील आलेल्या कार्यकर्ते व मतदार यांच्या संखेवर बघितली जायची.

मतदाराबरोबर थेट संवाद, घरोघरी भेटीगाठी व मतदारच्या समश्या वर चर्चा या प्रचारावर लागणारी मेहनत, वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात असायचा आता मात्र, स्मार्टफोनचा वापर, स्वस्त इंटरनेट आणि सोशल मीडियाची सर्वत्र जात असल्याने सध्याच्या निवडणुकीचे प्रचाराचे स्वरूप वेगाने बदलत आहे यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय झालेले दिसत आहेत.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरून रील्स, शॉर्ट व्हिडिओ, आकर्षक पोस्टर आणि घोषणाबाजीचा मारा सुरू आहे. एखाद्या उमेदवाराचा एका मिनिटाचा व्हिडिओ मतदार संघातील सर्व व्हॉट्‌‍सॲप ग्रुपवर हजारो मतदारांपर्यंत पोहचवून प्रचाराची दिशा ठरवताना दिसत आहे.

पहिला प्रचार कसा होता?

मागे प्रचारासाठी सर्वच पक्षांना भरपूर वेळ मिळायचा सगळे पक्ष गावातील वर्दळीच्या ठिकाणी पोस्टर, फलक आणि झेंडे, भिंतीवर उमेदवार चिन्ह रंगवत असत तसेच गाड्या वर भोंगे, पद यात्रा, मोठ्या सभां या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होते तसेच घरोघरी भेटी व थेट मुलाखत घेऊन कार्यकर्ते वाढवत होते.

आताचा प्रचार कसा आहे?

यावर्षी प्रचारसाठी आठ दिवस असल्याने उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी असल्यामुळे थोड्या कालावधीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया, व्हॉट्‌‍सॲप ग्रुपवर रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ, तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमातून प्रचारात रंगत आणली जाणार हे चित्र सध्या सोशल मीडियावर दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT