पारगाव येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू file photo
धाराशिव

पारगाव येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू

वाशी तालुक्यातील पारगाव येथे केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा खरेदी केंद्राचा शनिवारी (दि. २१) उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Gram Procurement Center Opened at Pargaon

वाशी, पुढारी वृत्तसेवा : वाशी तालुक्यातील पारगाव येथे केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा खरेदी केंद्राचा शनिवारी (दि. २१) उत्साहात प्रारंभ करण्यात आला. नाफेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. 'शनेश्वर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, वाशी पारगाव' यांच्या वतीने या खरेदी केंद्राचे संचालन केले जाणार आहे.

शासनाच्या हमीभावामुळे शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी अडवणूक थांबून त्यांच्या पिकाला योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन युवा सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता तळेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीचे संचालक तथा शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर, ग्रामपंचायत सदस्या अंजली समाधान मोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास समाधान मोटे, अॅड. प्रवीण गाडे, पोपट सुरवसे, महेश आटोळे, अशोक जाधव, सीताराम कुलकर्णी, कांतीलाल पाटील, महावीर चोरडिया, संभाजी मुळे, चेतन तातुडे, बाबा हारे, तानाजी कोकाटे, रामदास खारतोडे, बाबू अण्णा मोटे यांच्यासह पारगाव परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरभऱ्याची नोंदणी करून हमीभावाने विक्री करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विकास भगवान तळेकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT