Ghatasthapana : तुळजाभवानी मंदिरात यंदा ११ ऑक्टोबरला होणार घटस्थापना file photo
धाराशिव

Ghatasthapana 2026 : तुळजाभवानी मंदिरात यंदा ११ ऑक्टोबरला होणार घटस्थापना

संस्थानकडून कार्यक्रम पत्रिका जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Ghatasthapana at the Tuljabhavani Temple will take place on October 11 this year

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांची पत्रिका मंदिर संस्थानकडून जाहीर करण्यात आली आहे. यंदा १४ दिवस विविध धार्मिक विधी होणार असून, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार आहे.

६ ऑक्टोबरपासून देवीची मंचकी निद्रा सुरू होईल. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करून दुपारी घटस्थापना व स्थानिक ब्रह्मवृंदांना वर्णी देण्यात येईल. १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान नित्योपचार पूजा व रात्री छबिना होईल.

१५ ऑक्टोबरला ललिता पंचमीनिमित्त स्थालंकार महापूजा, तर १६ रोजी मुरली अलंकार महापूजा होईल. १७ ऑक्टोबरला शेषाही महाअलंकार पूजा, १८ रोजी भवानी अलंकार महापूजा, तर १९ ऑक्टोबरला दुर्गाष्टमीनिमित्त महिषासुरमर्दिनी महाअलंकार पूजा होईल. याच दिवशी वैदिक होम सुरू होऊन सकाळी ११ वाजता पूर्णाहुती होईल. २० ऑक्टोबरला महानवमीनिमित्त होमावरील धार्मिक विधी व घटोत्थापन होईल. सायंकाळी शहराच्या सीमेवर शमीपूजन होणार आहे. २१ ऑक्टोबरच्या पहाटे नगरच्या पलंग पालखीमध्ये ऐतिहासिक तुळजाभवानी देवीचे शिलंगण होईल.

२६ ऑक्टोबरला मंदिराची पौर्णिमा असून मध्यरात्री देवीची मूर्ती मुख्य चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित होईल. याच दिवशी सोलापूर येथील शिवलाल तेली समाजाच्या काठ्यांचे आगमन होणार असून तीन दिवस काठ्यांसोबत देवीचा छबिना निघणार आहे. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानसह नगरपरिषद, महसूल व पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT