Dharashiva News : ५ हजार कुटुंबांना गंगणे मित्र मंडळाकडून भाऊबीज भेट  File Photo
धाराशिव

Dharashiva News : ५ हजार कुटुंबांना गंगणे मित्र मंडळाकडून भाऊबीज भेट

नेते विनोद गंगणे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने यंदा १५व्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने ५ हजार कुटुंबांना भाऊबीज भेट देण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

Gangane Mitra Mandal gifts Bhaubeej to 5,000 families

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजापुरात गोरगरिबांसाठी समाजकारणाच्या माध्यमातून कार्य करणारे नेते विनोद गंगणे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने यंदा १५व्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने ५ हजार कुटुंबांना भाऊबीज भेट देण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजप जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांनी भूषविले. यावेळी महंत तुकोजी महाराज, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी आमदार रेड्डी, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सज्जनराव साळुंखे, सौ. अर्चना गंगणे, पंडितराव जगदाळे, बाळासाहेब शामराज, नागेश नाईक, औदुंबर कदम, गणेश कदम, विशाल रोचकरी, अमर हंगरगेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. महंत तुकोजी महाराज यांच्या हस्ते पहिली भेट देण्यात आली.

कार्यक्रमानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थित राहून लाभार्थी महिलांना दिवाळी किटचे वाटप केले. त्यांनी विनोद गंगणे यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना गोरगरिबांसाठी दिवाळी साजरी करण्याची ही संकल्पना अनुकरणीय आहे, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांनी गंगणे यांच्यावर तुळजापूरकरांचा असलेला विश्वास हे दुर्मिळ उदाहरण असल्याचे नमूद केले. नितीन काळे यांनी हा कार्यक्रम समाजासाठी मोलाचा आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT