बनावट सोनसाखळी विकून साडेतीन लाखांची फसवणूक pudhari photo
धाराशिव

Financial fraud : बनावट सोनसाखळी विकून साडेतीन लाखांची फसवणूक

धाराशिव शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : कमी किमतीत सोन्याची साखळी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना धाराशिव शहरात घडली. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्नेहल दत्ता नन्नवरे (वय 22, रा. कुरणे नगर, ता. धाराशिव, मूळ रा. भातंब्रे, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील एका रिटेल-होलसेल दुकानाजवळ दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. कमी किमतीत सोन्याची साखळी विकायची असल्याचे सांगून त्यांनी फिर्यादीला ती खरेदी करण्यास प्रवृत्त केले.

फिर्यादीने साखळी खरेदी केल्यानंतर ती सोन्याची नसून पितळसदृश धातूची असल्याचे लक्षात आले. अशा प्रकारे आरोपींनी 3 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नन्नवरे यांनी 6 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT