भूम : भूम तालुक्यातील सुकटा शिवारात अवैध मुरूम उत्खनन सुरू असताना माजी सरपंच बजरंग गोयकर यांनी फोटो काढल्याने त्यांच्यावर सात जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी घडली होती. त्यानंतर दि.८ रोजी संध्याकाळी सात आरोपीवर भूम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीमध्ये बजरंग गोयकर यांच्यासह स्वप्निल गोयकर आणि ज्ञानेश्वर करगळ यांनाही मारहाण करण्यात आली. जखमींना उपचारासाठी बार्शी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत सुधारल्यानंतर बजरंग गोयकर यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीवरून पांडुरंग पांढरे (रा. सुकटा), संकेत साळवे (रा. सुकटा), संदीप सरवदे (रा. भूम), भरत कांबळे (रा. भवानवाडी), पवनचक्कीचे जाधव (रा. भूम), भैय्या उर्फ सचिन जानकर (रा. भूम), प्रदीप पिसे (रा. भूम) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहपोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके करत आहेत.