लिंबाबाई वासुदेव आणि मानसी वासुदेव Pudhari
धाराशिव

Dharashiv Crime | धाराशिव हादरले: पत्नीसह मुलीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून

उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथील खळबळजनक घटना; आरोपीने स्वतःच पोलीस ठाण्यामध्ये जाऊन दिली गुन्ह्याची कबुली

पुढारी वृत्तसेवा

Umarga Kills Wife and Daughter

मुरूम : उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीसह आपल्या ८ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने स्वतःच मुरूम पोलिसात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित अणप्पा वासुदेव हा मंगळवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मुरूम पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार यांच्यासह मुरूम पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप दहिफळे व पोलिस कर्मचारी दाखल झाले व घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत मुरूम येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातील मृत लिंबाबाई अजित वासुदेव तसेच 8 वर्षीय मुलगी मानसी अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान दुपारी पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी मुरूम पोलीस ठाण्यामध्ये घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT