Crime News :  file photo
धाराशिव

Tuljapur Crime | मोबाईलसाठी पैसे न दिल्याने मुलाकडून वडिलांचा खून

तुळजापूर तालुक्यातील येवती येथील धक्कादायक घटना; लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत ५६ वर्षीय पित्याचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Tuljapur Son Kills Father

धाराशिव : मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील येवती येथील डोंबाळे वस्तीवर घडली. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी संशयित मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

खंडू पांडुरंग डोंबाळे (वय ५६) असे मृत वडिलांचे नाव असून, श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय २९) असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीशैल याने मोबाईल खरेदी करण्यासाठी वडील खंडू डोंबाळे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने श्रीशैल संतापला. त्याने वडिलांना शिवीगाळ करीत लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात खंडू डोंबाळे गंभीर जखमी झाले. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी मृताची पत्नी सुरेखा खंडू डोंबाळे (वय ५०) यांनी बुधवारी (दि. ११) नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्रीशैल डोंबाळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT