Dharashiv Accident Pudhari
धाराशिव

Dharashiv Teacher Accident: धाराशिवमध्ये जनगणनेचं काम करून परतणाऱ्या शिक्षकाचा अपघातात मृत्यू

Bembli Zp School: ते बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते.

पुढारी डिजिटल टीम

रहीम शेख, धाराशिव

धाराशिव तालुक्यात जनगणनेचं काम आटपून घरी परतणाऱ्या शिक्षकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गोविंद इंगळे असे या शिक्षकाचे नाव असून ते बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते.

बेंबळी येथे पेट्रोल पंपासमोर झालेल्या शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कणगरा येथील रहिवासी गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. गोविंद इंगळे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद इंगळे हे जनगणनेचे काम पूर्ण करून दुचाकीवरून धाराशिवकडे जात होते. हा अपघात इतका भीषण होता की इंगळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT