धाराशिव

धाराशिव: उमरगा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

अविनाश सुतार

उमरगा, पुढारी वृत्तसेवा: उमरगा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने आज (दि१) सकाळी तहसील व उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मारकापासून निघालेल्या या मोर्चात मसनजोगी व पोचाम्मा समाज बांधव पारंपरिक वेशभुषेत सहभागी झाले होते. ढोल- ताशांचा गजर, एकच पर्व ओबीसी सर्व, जो ओबीसी की बात करेगा, वही देश पर राज करेगा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.बुरबुर पोचाम्मा, मसन जोगी समाज व पोतराज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात "सगेसोयरे" या शब्दाची व्याख्या बदलून २६ जानेवारी २०२४ अधिसूचनेचा मसूदा रद्द करण्यात यावा, राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी, तसेच चुकीच्या कार्यपध्दतीने व बेकायदेशीररित्या वितरीत होणाऱ्या मराठा – कुणबी किंवा कुणबी – मराठा प्रमाणपत्रांचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी. राज्यातील गोरगरीब ओबीसी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संपर्क कार्यालयात देण्यात आले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT