Dharashiv News : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात लोहारा तहसील जिल्ह्यात प्रथम file photo
धाराशिव

Dharashiv News : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात लोहारा तहसील जिल्ह्यात प्रथम

केंद्र सरकारच्या 'भारताची जनगणना २०२७' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामकाज विहित मुदतीपूर्वी आणि अचूकपणे पूर्ण करत लोहारा तहसील कार्यालयाने धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण चार्ज कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News: Lohara Tehsil district ranks first in the first phase of the census

लोहारा, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या 'भारताची जनगणना २०२७' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामकाज विहित मुदतीपूर्वी आणि अचूकपणे पूर्ण करत लोहारा तहसील कार्यालयाने धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण चार्ज कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते तहसीलदार रणजितसिंह कोळेकर आणि त्यांच्या पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जनगणनेसारख्या महत्त्वपूर्ण मोहिमेचे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी तहसीलदार कोळेकर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने यंत्रणेला दिशा दिली. महसूल अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्यात समन्वय ठेवत कामाचा नियमित आढावा घेण्यात आला. त्यामुळे निर्धारित वेळेपूर्वी पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करणे शक्य झाले.

या मोहिमेत सर्व कर्मचाऱ्यांनी सांघिक भावनेतून योगदान दिले. प्रशासकीय नियोजन, कामातील अचूकता आणि समन्वयाच्या जोरावर लोहारा तहसील कार्यालयाने जिल्ह्यातील अन्य ग्रामीण चार्ज कार्यालयांच्या तुलनेत आघाडी घेतली. या यशाबद्दल तहसीलदार कोळेकर आणि त्यांच्या पथकाचे विविध स्तरांतून अभिनंदन होत

धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळणे हा संपूर्ण लोहारा तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश केवळ माझे वैयक्तिक नसून महसूल अधिकारी, बीएलओ, बीएलए, पर्यवेक्षक, प्रगणक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र परिश्रमांचे फळ आहे. सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आणि अचूक नियोजनामुळे निर्धारित उद्दिष्ट मुदतीपूर्वी पूर्ण करता आले."
- रणजितसिंह कोळेकर, तहसीलदार, लोहारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT