Dharashiv News : बनावट दिव्यांग प्रवाशाची चालक, वाहकावर दादागिरी file photo
धाराशिव

Dharashiv News : बनावट दिव्यांग प्रवाशाची चालक, वाहकावर दादागिरी

तत्कालीन आगारप्रमुख राम शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News: Fake disabled passenger bullies driver, conductor

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : बनावट दिव्यांगत्वाचे कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक केल्याचे प्रकार नवीन नसून आता एसटी महामंडळानेही यावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बोगसगिरी उघडकीस आल्यानंतर तिकिटासाठी धमकावणाऱ्या अशाच एक बनावट दिव्यांग प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यांग प्रवाशांसाठी एसटी महांमडळातर्फे 'वन फोर्थ' तिकीट दिले जाते. म्हणजेच प्रवास भाड्याच्या केवळ २५ टक्के आकारणी होते. या सेवेचा लाभघेण्यात अनेक शासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच काही सामान्य नागरिकही आघाडीवर आहेत. एसटीतून प्रवास करणाऱ्या अशा दिव्यांग प्रवाशांत बनावट कार्डधारकांची संख्याही मोठी आहे.

अशांवरच आता एसटी महामंडळाने कारवाईचे अस्त्र बाहेर काढले आहे. तुळजापूर पोलिस ठाण्यात अशाच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन बापुराव लोखंडे (रा. आंबेजवळगे, ता. जि. धाराशिव), राम शिंदे (तत्कालीन आगारप्रमुख तुळजापुर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एआय निर्मित कावलदरा ते तुळजापूर बसस्थानकादरम्यान हा प्रकार घडला. धाराशिव आगाराचे चालक उमेश दिलीप पवार हे बस चालवत असताना आरोपींनी ५३ टक्के शारीरिक दुर्बलतेचे असल्याचे दर्शविणारे बनावट कार्ड वापरल्याचा आरोप आहे.

'माझे कार्ड दे, अन्यथा तुला या रोडवर ड्युटी करू देणार नाही', अशी दमदाटी करून चालक व वाहकाला शिवीगाळ करण्यात आली. तसेच बस अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महिला वाहकाला निलंबनाची धमकी देत बनावट कार्ड असतानाही 'वन फोर्थ' तिकीट देण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी उमेश पवार यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आगारप्रमुख शिंदे यांनी मात्र अद्याप मला माहिती मिळाली नसल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

शोधमोहीम राबविण्याची गरज

एसटी प्रवासात दिव्यांग नागरिकांना सहज प्रवास घडावा. त्यांना इतरांसारखे जीवन जगता यावे यासाठी सरकारने सवलत दिली आहे. याचा लाभअनेक दिव्यांग बांधव घेतात. मात्र याचा गैरफायदा घेण्यात मात्र नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. घेत आहेत. एकदा एसटी महामंडळाने विशेष पथकाच्या माध्यमातून एकाच वेळी बनावट दिव्यांग कार्डधारकांची तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT