Tuljabhawani Temple : तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेसाठी १९ सप्टेंबरपासून नोंदणी!

Tuljabhawani Temple
Tuljabhawani
Published on
Updated on

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेची संधी सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावी, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने ऑक्टोबर २०२६ मधील सिंहासन पूजेच्या ऑनलाइन नोंदणी व सोडतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होऊन २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रथम ऑनलाइन सोडत काढण्यात येईल. निवड झालेल्या भाविकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असून, २७ ते २८ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन पेमेंट करता येईल.

पूजेची संख्या पूर्ण न झाल्यास २८ सप्टेंबरला द्वितीय, तर २९ सप्टेंबरला तृतीय सोडत काढण्यात येणार आहे. तिसऱ्या सोडतीतील भाविकांना ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पेमेंट करता येईल. अंतिम बुकिंग यादी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. भाविकांनी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ४ ते १० ऑक्टोबर आणि २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान मंचकी निद्रा असल्याने सिंहासन पूजा बंद राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news