Dharashiv News : राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा देत भूम येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको file photo
धाराशिव

Dharashiv News : राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा देत भूम येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत शासनाच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली.

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News : Block farmers' road in Bhum supporting Raju Shetty's movement

भूम, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि. ५) भूम शहरातील नगर रोडवरील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौक (ईट गोलाई) येथे ४५ मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत शासनाच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली.

अतिवृष्टी, अवर्षण, पावसातील अनिश्चितता आणि वाढता शेती खर्च यामुळे भूम तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिएकर ५० हजार रुपये अनुदान द्यावे, खरीप पीकविमा तातडीने वितरित करावा, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, पाणीटंचाईग्रस्त ऊस उत्पादकांना तोडणीत प्राधान्य द्यावे, मागील हंगामातील उसाला प्रतिटन ५०० रुपये अतिरिक्त हप्ता आणि चालू हंगामात प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा.

तसेच उसाचे बिल १५ दिवसांत अदा करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी मराठवाडा अध्यक्ष रविंद्र इंगळे, जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, तालुकाध्यक्ष अमृत भोरे, परंडा तालुकाध्यक्ष रामेश्वर नेटके यांच्यासह राहुल पाटील, प्रशांत गोफने, संजय गोफने, गजानन सोलांकर, साळुंखे महाराज, दत्ता चव्हाण आदींसह शेतकरी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT