Woman abuse Pudhari
धाराशिव

Dharashiv Crime : नृत्य शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धाराशिव शहर पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : नृत्य शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडितेच्या आईने केली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून १२ सप्टेंबरपर्यंत संबंधित तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीला नृत्य शिकवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी पीडितेच्या आईने १४ सप्टेंबर रोजी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

धाराशिव लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याने त्यातून मुलाचा जन्म झाल्याचा आरोप वाशी तालुक्‍यातील एका २९ वर्षीय महिलेने केला आहे. मुलाच्या आधारकार्डवर वडिलांचे नाव लावण्यास सांगण्यासाठी गेल्यानंतर संबंधित तरुणाने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०१८ ते ४ जुलै २०२६ या कालावधीत संबंधित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारातून महिला गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला. त्यानंतर मुलाच्या आधारकार्डवर वडिलांचे नाव लावण्यासाठी संबंधित तरुणाकडे ती गेली. यावेळी त्याने महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT