dharashiv Health Minister Prakash Abitkar
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :
सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा हा यामागील प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यात गंभीर आजारांनी त्रस्त व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी उपशामक सेवा सेवेच्या प्रभावी अंमलबजा वणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपशामक सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे.
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय धाराशिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या समन्वयातून ही सेवा राबविण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयात दहा स्वतंत्र उपशामक काळजी बेडची व्यवस्था करण्यात आली असून उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत आठवड्यातून एक दिवस विशेष तज्ज्ञ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट व डॉक्टर यांच्या माध्यमातून उपचार व समुपदेशन केले जाणार आहे.
कर्करोग, हृदयरोग, मेंदूविकार, अर्धांगवायू, एड्स तसेच दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना गट अ, व व क अशा वर्गवारीनुसार सेवा दिली जाईल. गट अ व ब रुग्णांना गृहभेटीद्वारे उपचार मिळणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, सामुदायिक आरोग्य अधिकारी व आशा स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरपोच सेवा उपलब्ध होणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांनी सांगितले की, उपशामक सेवेच्या माध्यमातून वेदना नियंत्रणासोबत मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आधारही दिला जाणार असून रुग्णांच्या कुटुंबीयांनाही आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.