भूमः भूम शहारातील ए.जे. मोटार गॅरेजमध्ये माथेफीराने मध्यरात्री आग लावून विक्रीस ठेवलेल्या तीन गाड्या जळून खाक केल्या. भूम शहरातील एस.पी. कॉलेज रोडवरील ए.जे. मोटार गॅरेजमध्ये मध्यरात्री सुमारे दीड ते दोनच्या दरम्यान एका अज्ञात भामट्याने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत वेगवेगळ्या कंपन्यांच्या विक्रीसाठी ठेवलेल्या तीन गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच भूम नगर परिषदेची अग्निशमन गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले होते आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या घटनेत ए.जे. मोटार गॅरेजचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. भूम पोलिस ठाण्यास या घटनेबाबत पंचनामा करणेकामी कळविले असल्याचे अज्जू जमादार यांनी सांगितले आहे. यात होतकरू अज्जू जमादार यांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.