

परंडा पुढारी वृत्तसेवा: भूम तालुक्यातील पाथ्रुड येथील एका १८ वर्षीय तरुणास प्रेमप्रकरणातुन रॉड, काठी व शस्त्राने बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना पांढरेवाढी ते कोकणे वस्ती या परिसरातील रस्त्या लगत घडली आहे.
या घटनेत आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला असून सात ते आठ जणांनी अठरा वर्षीय तरुणास जबरी मारहाण केली आहे. त्याच बरोबर त्याच्या गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने गंभीर इजा केल्याचे समजते. तर त्याला मारहाणीनंतर मृत झाल्याचे समजून रस्त्याच्या बाजूस फेकून दिल्याची घटना मंगळवारी (दि. ११) घडली. सदरील घटना प्रेमप्रकरनातून घडल्याचे समोर येत आहे. सध्या हा तरुण सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
सदरील गुन्ह्यातील आरोपी सतीश जगताप व राहूल मोहिते पांढरेवाडी, आकाश मगर, शेळगाव, विजय पाटील सोनारी या चौघानां पोलिसांनी ताब्यात घेतले असून सबंधितावर आंबी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस निरिक्षक खरड यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास आंबी पोलिस करत आहेत.