धाराशिव : नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर शहरात असे बॅनर झळकले आहेत. 
धाराशिव

Dharashiv councillors switch sides-धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीचा थरार

भाजप प्रवेशासाठी निघालेले नगरसेवक रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : शहराच्या राजकारणात नगरसेवकांच्या पक्षांतरावरून मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्यासाठी महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तीव्र चढाओढ पाहायला मिळाली.

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशासाठी मुंबईकडे निघालेले नगरसेवक वाटेतूनच अचानक माघारी फिरले आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून थेट ठाण्यात पोहोचत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, या नाट्यमय घडामोडीनंतर धाराशिव शहरात पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात स्थानिक मतदारांनी थेट घरासमोर फलक लावून तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'एक खोका, मतदाराला धोका' अशी बॅनरबाजी सुरू केली. ठाकरे गटाच्या नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक या नगरसेवकांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते.

हे पथक पुणे जिल्ह्यातील इंदापूरपर्यंत पोहोचले असता नगरसेवकांनी अचानक यू टर्न घेतला आणि ते मुंबईऐवजी पुन्हा धाराशिवला परतले. धाराशिवला परतल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सूत्रे हाती घेत या नगरसेवकांना थेट ठाण्यात नेले. तेथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिव नगर परिषदेच्या नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT