सटवाईवाडी येथील पाझर तलावाला पडलेले भगदाड Pudhari Photo
धाराशिव

Crack in The Seepage Pond | सटवाईवाडी येथील पाझर तलावाला भगदाड : तलाव फूटण्याची शक्‍यता?

तीन गावांना निर्माण झाला धोका : प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

रत्नापूर : वाशी तालुका परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सटवाईवाडी येथील पाझर तलावाच्या बांधाला भगदाड पडले आहे. यामुळे तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, कळंब तालुक्यातील रत्नापूर व टेकाळे वस्ती पानगाव या तिन्ही गावांना धोका निर्माण झाला आहे.

या गंभीर परिस्थितीची माहिती येरमाळा मंडळ अधिकारी नागटिळक यांनी तातडीने कळंब तहसीलदार व वाशी तहसीलदार यांना दिली आहे. दरम्यान, रत्नापूरचे सरपंच सुनील वाघमारे व पोलीस पाटील सुशेन पाटील यांनी गावातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अशी सूचना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासन व बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून, तलावातील पाणी नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तलाव फुटल्यास मोठ्या प्रमाणात शेती व घरांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक अफवा न पसरवता प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT