Boyfriend sentenced to rigorous imprisonment for girlfriend's murder
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने प्रियकर आरोपीस आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए. डी. देव यांच्या न्यायालयात देण्यात आला.
या प्रकरणात आरोपी विष्णू लक्ष्मण लोंढे याचे गावातीलच मोहिनी चोपडे या महिलेशी ओळख झाली. त्यातूनच त्याने तिच्याकडे १० ऑगस्ट २०१७ रोजी शरीरसुखाची मागणी केली. त्यात तिने विरोध केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. या झटापटीत आरोपी लोंढे याने मोहिनीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याने ती गंभीर भाजून मृत्युमुखी पडली.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. संबंधित महिलेच्या पतीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले. प्रकरणाची सुनावणी चालू असताना सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
सरकारी अभियोक्ता एम. बी. देशमुख यांनी सरकारी पक्षाचे काम पाहिले. त्यांनी न्यायालयात ठोस पुरावे सादर करून आर-ोपीचा दोष सिद्ध केला. न्यायालयाने आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ४५,००० रुपयांचा दंड ठोठावला. हा निकाल बुधवारी (दि. १२) जाहीर झाला.