Dharashiv News : बेपत्ता मुलाचा मृतदेह शेततळ्यात आढळला file photo
धाराशिव

Dharashiv News : बेपत्ता मुलाचा मृतदेह शेततळ्यात आढळला

हा १३ वर्षाचा मुलगा करणकुमार हा १४ मार्च रोजी घरातून अचानक बेपत्ता झाला होता.

पुढारी वृत्तसेवा

Body of Missing Boy Found in Farm Pond

कळंब, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भाटशिरपुरा येथून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. करणकुमार बबलू राय असे या मृत मुलाचे नाव आहे.

मूळचे दुधैला (जि. पाटणा, बिहार) येथील रहिवासी असलेले बबलू रामभवन राय हे गेल्या सात महिन्यांपासून भाटशिरपुरा येथे सहकुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांचा १३ वर्षाचा मुलगा करणकुमार हा १४ मार्च रोजी घरातून अचानक बेपत्ता झाला होता. सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

१७ मार्च रोजी सकाळी शेतातील एक कामगार मोटार चालू करण्यासाठी शेततळ्याजवळ गेला असता, त्याला पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला त्यांनी तातडीने ही माहिती गावकरी व शिराढोण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शहानिशा केली असता सदर मृतदेह बेपत्ता असलेल्य करणकुमारचाच असल्याचे निष्पन झाले.

शेततळ्याच्या गेटजवळ मुलाची चप्पल आणि तळ्याच्या काठावर टी-शर्ट व पॅन्ट आढळून आली आहे. डॉक्टरांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर पवार हे करत आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT