Dharashiv News : नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई २ लाख वसूल  File Photo
धाराशिव

Dharashiv News : नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई २ लाख वसूल

उमरग्यात पोलिसांची २६१ वाहनांवर कारवाई,

पुढारी वृत्तसेवा

Action taken against drivers violating rules, Rs 2 lakh recovered

उमरगा, पुढारी वृत्तसेवा: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर उमरगा पोलिसांनी गुरुवारी, (दि ३१) अचानक विशेष मोहीम राबवली. यात २६१ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करीत तब्बल २ लाख २१ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे वाहन चालकांचे धाबे दण-ाणले आहेत. तर अशा कारवाईत सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

उमरगा शहरात मोठी बाजारपेठ, खाजगी दवाखाने, शैक्षणिक संस्था व शासकिय कार्यालयात कामकाजासाठी दररोज विविध भागातील हजारो नागरिक दुचाकी, चार चाकी टमटम अॅटोने येतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ट्रिपल सीट प्रवास करणे, फॅन्सी नंबर, विना परवाना, विना नंबर, मोबाईलवर बोलत भरधाव वेगाने वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे यामुळे सतत वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं होते.

वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या वादावादीच्या घटना तसेच या कोंडीमुळे महिला व पुरुष व विद्याथ्यर्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत होते. याला आळा घालण्यासाठी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पोलिस ठाण्यासमोर गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी तीनच्या दरम्यान नाकाबंदी बंदी करीत एक विशेष मोहीम राबवली.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९१ वाहनचालकांवर ऑनलाईन पद्धतीने १ लाख ५१ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला. तर ७० वाहन चालकांना ऑफलाईन पावती देऊन ६० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली असली तरी यात ते किती सातत्य ठेवतात हे पाहावे लागणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने अस्ताव्यस्त उभी करू नयेत, यापुढे अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले.

दवाखान्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था

पोलीस ठाण्यासमोर दुचाकी, तीनचाकी रिक्षा व चारचाकी वाहन चालकांवर कारवाई दरम्यान अनेक दुचाकी चालक रुग्णालयाचे कारण सांगून कारवाईपासून बचाव करीत होते, यावेळी दवाखान्याचे खोटं कारण सांगताना वाहनचालकांची बोबडी वळली होती. मात्र पोलिसांनी याचीही खबरदारी घेत खरोखरच दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णाला पोहोचविण्यासाठी एका स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT